नऊ महापालिकांसाठी तयारी, प्रारूप मतदारयाद्या १३ ऑगस्टला

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार.
elections voter lists
elections voter lists Sakal
Summary

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार.

मुंबई - मीरा भाईंदर, पनवेल, मालेगाव महापालिकेसह औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार असून त्यावर २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुभा असेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आणि ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन केल्यानंतर १३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत संबंधित ठिकाणी हरकती आणि सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

फक्त याच दुरुस्त्या

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतात, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com