
CM शिंदेचे ‘मिशन-200’; आता राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार फोडणार?
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांच्या जोरावर महाविकास आघाडीचे सरकार पाडले. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपली राजकीय उंचीही दाखवून दिली. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) आमदारांकडे डोळे लावून बसल्याचे बोलले जात आहे. कारण, एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार (President Election) द्रौपदी मुर्मू यांना २०० आमदार मतदान करतील, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. (Eknath Shinde Latest Marathi News)
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (President Election) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मिशन-२००’ हातात घेतले आहे. सध्या भाजप आणि शिंदे गटाकडे एकूण १७० आमदार आहेत. शिवसेनेने द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यापासून आमदारांची संख्या १८५ वर गेली आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे हे २०० आमदारांचे लक्ष्य गाठण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) आमदारांकडे डोळे लावून आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा: भारताने १८ महिन्यांत २०० कोटी कोरोना लसीकरणाचे लक्ष्य गाठले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना २०० आमदारांचे मत मिळवण्यासाठी १५ आमदारांची गरज आहे. त्यामुळे ते काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडू शकतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेत काँग्रेसचे ४४ आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ५३ आमदार आहेत. अशा स्थितीत आणखी १५ आमदार कुठून आणणार हे पाहावे लागेल.
विरोधकांचे मत फुटणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती निवडणुकीत ‘मिशन २००’ हाती घेतले आहे. राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना २०० आमदार मतदान करतील असा दावा त्यांनी केला होता. बहुमत सिद्ध करताना शिंदे सरकारकडे १६४ आमदार होते. उद्धव ठाकरे यांनी द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने १८५ आमदारांचा पाठिंबा झाला आहे. त्यामुळे उरलेली १५ मत विरोधकांची फोडावी लागणार आहेत. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मत फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
... तर नवल वाटायला नको
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे मत फुटले होते. तसेच विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात जणांनी विरोधात मतदान केले होते. विश्वासदर्शक ठरवा वेळीही काँग्रेस दहा आमदार अनुपस्थित होते. यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत मत फुटल्यास नवल वाटायला नको.
Web Title: President Election Eknath Shinde Congress National Congress Party
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..