राष्ट्रपती आज रायगडावर; पायथ्याला पोलिसांचा फौजफाटा

संपूर्ण परिसरात सर्वसामान्य नागरिकांना येण्या जाण्यास बंदी असल्याने रस्त्यावर फक्त पोलिस दिसत आहेत.
Rashtrapati Ramnath Kovind
Rashtrapati Ramnath Kovindesakal
Summary

संपूर्ण परिसरात सर्वसामान्य नागरिकांना येण्या जाण्यास बंदी असल्याने रस्त्यावर फक्त पोलिस दिसत आहेत.

रायगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) हे आज रायगडावर शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. राष्ट्रपती आज दुपारी सव्वा बारा वाजता किल्ले रायगडास भेट देणार आहेत. हेलिकॉप्टरने ते पाचाड येथे उतरणार असून त्यानंतर किल्ले रायगडवर रोपवेने जाणार आहेत. राष्ट्रपती किल्ले रायगडावर येणार असल्याने महाडपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. (president ramnath kovind) सुरक्षेसाठी ठिकठिकाणी तपासणी सुरु आहे. (Ramnath Kovind Raigad Visit)

दरम्यान, रायगड परिसरात सध्या मोठा पोलिस फाटा (Police) तैनात करण्यात आला आहे. चेक नाके तयार करण्यात आले आहेत. सध्या पाचाड परिसरालाही पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. केवळ पासधारकांना सोडले जात आहे. महाड ते पाचाड दरम्यान ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे. किल्ले रायगडावर होळीचा माळरान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला, मेघडंबरी, जगदीश्वर तसेच समाधी स्थळाला आकर्षित फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसरात सर्वसामान्य नागरिकांना येण्या जाण्यास बंदी असल्याने रस्त्यावर फक्त पोलिस दिसत आहेत.

Rashtrapati Ramnath Kovind
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याची रायगडावर जय्यत तयारी

नाते खिंडी ते रायगडमधील गावातील नागरिकांना आधारकार्ड दाखवुनच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा पोलिस दलाचे तीन हजार अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. दरम्यान सन १९९९ नंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती हे किल्ले रायगडावर (raigad) येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय योजना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. पाचाड येथील बाजारपेठ ही पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे.

दरम्यान, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर १९८५ ला होते. त्यानंतर ३५ वर्षांनंतर राष्ट्रपती गडाला भेट देणार आहेत. यामुळे शिवप्रेमींच्यामध्ये मोठा उत्साह आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी १९८० ला रायगडावर आल्या होत्या. त्यांनी सिंहासनाच्या जागेवर मेघडंबरी उभारण्याची सूचना केली होती. मेघडंबरीचे काम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते मेघडंबरीचे अनावरण झाले. या घटनेला पस्तीस वर्षे झाली आहेत.

Rashtrapati Ramnath Kovind
राजकीय बंडखोरीची शक्यता; राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com