पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मे रोजी ‘या’ कार्यक्रमासाठी येणार सोलापुरात! जुलैमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याची शक्यता, वाचा सविस्तर...

विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती स्मारक देखील उभारण्यात आले आहे. ३१ मे रोजी अहिल्यादेवींच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशासकीय इमारत व अहिल्यादेवींच्या स्मारक लोकापर्णासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
Pm modiji and president murmu madam
Pm modiji and president murmu madamsakal solapur
Updated on

सोलापूर : हिरज रोडवरील ४८२ एकरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्वतंत्र ५० कोटींची प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन बांधले जात आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती स्मारक देखील उभारण्यात आले आहे. ३१ मे रोजी अहिल्यादेवींच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशासकीय इमारत व अहिल्यादेवींच्या स्मारक लोकापर्णासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सध्याच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात ११ संकुले असून त्याठिकाणी ४४ कोर्स सुरू आहेत. मुला-मुलींचे वसतिगृहे देखील याच परिसरात आहेत. विद्यापीठाच्या महत्त्वाच्या परीक्षा विभागाला स्वतंत्र जागाच सध्याच्या ठिकाणी नाही. विद्यापीठात सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, छत्रपती संभाजी महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या नावे अध्यासन केंद्रे आहेत. पण, ते कोणत्या ठिकाणी आहेत हे लवकर सापडत नाही. त्यासाठी स्वतंत्र जागाच नाही.

या पार्श्वभूमीवर ३१ मे रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सर्व विभागांचे कामकाज ४८२ एकरातील नवीन इमारतीतून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर १८ मार्च रोजी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली त्या बांधकामाचा आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, दोन्ही महत्त्वाच्या लोकापर्णाच्या कार्यक्रमासाठी राज्यपालांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठविण्यात येणार असून ते निश्चितपणे येतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. महानवर यांनी अंदाजपत्रक बैठकीच्या शेवटी व्यक्त केला.

जुलैमध्ये राष्ट्रपतींना बोलावण्याचे नियोजन

विद्यापीठाच्या हिरज रोडवरील ४८२ एकरात विविध खेळांसाठी ‘पीएम-उषा’मधून मिळालेल्या निधीतून इनडोअर स्टेडिअम साकारले जात आहे. त्यासाठी १८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्याचेही काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल. या स्टेडिअमच्या लोकापर्णासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावण्यात येणार असल्याचेही कुलगुरूंनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com