कैद्याला मारहाण करून लावली विष्ठा खायला: रमेश कदम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई : ठाणे कारागृह प्रशासनाने एका कैद्याला जबर मारहाण करुन त्याला मानवी विष्ठा खायला लावली असा गंभीर आरोप अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी ठाणे जेल प्रशासनावर केला आहे.

रमेश कदम यांनी यासंदर्भात मानवाधिकार आयोगाला आयोगाकडे लेखी तक्रार नोंदवली असून आयोगाने जेल प्रशासनाला समन्स पाठवला आहे. कदम यांनी पत्रात म्हटले आहे की, ठाणे कारागृहात 27 जून 2018 रोजी एका कैद्याला प्रशासनाच्या कर्मचाऱयांनी लाथा बुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. शिवाय, मारहाणीवर न थांबता त्यांनी त्याला मानवी विष्ठा खायला लावली. या घटनेनंतर कैद्याला त्रास होऊ लागला. त्याला उलट्या झाल्यानंतर तो बेशुद्ध झाला.

दरम्यान, कदम यांनी यासंदर्भात मानवाधिकार आयोगाला आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. आयोगाने जेल प्रशासनाला समन्स पाठवला आहे. तसेच आरोपांना आधार म्हणून सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जेलर व इतर पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करु, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम सध्या अटकेत असून, त्यांनी 400 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Web Title: prisoner beaten up and force to eat potty in thane jail alleges mla ramesh kadam