पृथ्वीराज चव्हाणांनी पटोलेंचे टोचले कान; आघाडीबाबत म्हणाले...

"काँग्रेसनं स्वबळाचा नारा देणं यात काही गैर नाही"
nana patole_prithviraj chavan
nana patole_prithviraj chavansakal media

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कान टोचले आहेत. पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर प्रतिक्रिया देताना तीन पक्षांची आघाडी तोडण्याचा काँग्रेसचा कुठलाही विचार नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचा महाविकास आघाडीला पाच वर्षे पूर्णपाठिंबा राहिलं असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (Prithviraj Chavan pierced Patole ears Imp statement made about Mahavikas Aghadi)

nana patole_prithviraj chavan
'ओबीसी आरक्षणाचा विषय सोडून निवडणुका जाहीर करणे धक्कादायक'

चव्हाण म्हणाले, "तीन पक्षांच्या युतीनं जे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे, ते काँग्रेस तोडणार नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. भाजपला सरकारबाहेर ठेवण्यासाठी ही आघाडी तयार झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बाजूने या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही."

nana patole_prithviraj chavan
शिवसेनेच्या नगरसेविकेची हकालपट्टी; रिफायनरीच्या ठरावाला मतदान महागात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेसचा स्वबळाचा नारा दिला होता. तसेच पटोले यांनी हा नारा देताना मुख्यमंत्री व्हायची आपली सुप्त इच्छाही व्यक्त केली होती. काँग्रेस नेत्यांच्या या एकला चलोच्या नाऱ्यामुळे व्यथित झालेले शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या दिवशी संबोधनात काँग्रेसवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला होता. तसेच काँग्रेसला सबुरीचा सल्लाही दिला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेसचा स्वबळाचा नारा कसा महत्वाचा?

काँग्रेस महाविकास आघाडीला कमजोर करत असल्याचा दावा नाकारत चव्हाण म्हणाले की, "काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल असं म्हणण्यात काही गैर नाही. जर आम्ही एक तृतीयांश जागा लढवणार आहोत असं म्हटलं असतं तर यानुसार आमच्या वाटाल्या २८८ पैकी ८० जागाच येतील. पण त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये इतर जागांवर लढण्यासाठी उत्साह राहणार नाही."

नाना पटोलेंची केली पाठराखण

त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला देताना चव्हाण म्हणाले की, "त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचं विधान गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं विधान केलं आहे. अध्यक्ष असल्याने पक्षाची ताकद वाढवणे आणि पक्षात पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याचं विधान हे याच परिप्रेक्षातून समजून घेणं गरजेचं आहे. कारण तीन पक्षांची आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला होता. त्यामुळे या आघाडीबाबत काँग्रेस हायकमांडच निर्णय घेईल हे मुंबईत ठरवलं जाणार नाही."

शिवसेना-भाजपच्या डिप्लेमसीवरही केलं भाष्य

दरम्यान, दरवाज्यामागून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या डिप्लेमसीबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले की, "भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना हे माहिती आहे की, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील केमिस्ट्री चांगली नाही. त्यामुळे दिल्लीतील नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी थेट चर्चा करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. पण याचा अर्थ असा नाही की, त्यामुळे महाविकास आघाडीला त्याचा तात्काळ काही धोका असेल असं नाही."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com