पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, चार वर्षांपासून राहुल गांधींना भेटलोच नाही

Prithviraj Chavan said that he has not met Rahul Gandhi for four years
Prithviraj Chavan said that he has not met Rahul Gandhi for four yearsPrithviraj Chavan said that he has not met Rahul Gandhi for four years
Updated on

मी दिल्लीत असलो की कधी-कधी डॉ. मनमोहन सिंग यांना भेटतो. आता त्यांची प्रकृती पूर्वीसारखी राहिलेली नाही. मी सोनिया गांधी (Rahul Gandhi) यांनाही भेटलो आहे. परंतु, राहुल गांधींना चार वर्षांपासून भेटलो नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी गुरुवारी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. (Prithviraj Chavan said that he has not met Rahul Gandhi for four years)

चव्हाण हे काँग्रेसच्या (Congress) G-२३च्या असंतुष्ट गटाचे सदस्य आहेत. ते सलग पराभवानंतर पक्षात संघटनात्मक सुधारणांचा सल्ला देत आहे. काँग्रेस प्रमुखांनी पक्षाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी चिंतन शिबिर आयोजित केले होते. कोणीतरी निर्णय घेतला की चिंतन किंवा आत्मपरीक्षण करण्याची गरज नाही. काँग्रेस संमेलनात कोणतेही चिंतन किंवा स्व-मूल्यांकन झाले नाही, असे उदयपूर येथील चिंतन शिबिराबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan said that he has not met Rahul Gandhi for four years
रुबेलाचे कारण देत तुर्कीने परत पाठवला भारताचा गहू

२०२४ मध्ये नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) पराभव करायचा असेल तर आगामी १२ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत अधिक चांगली कामगिरी करावी लागेल. आम्हाला समविचारी पक्षांसोबत व्यापक युती करावी लागेल. मतांच्या विभाजनामुळे भाजप विजय झाला. राष्ट्रीय पर्याय म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोठी आघाडी झाली पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

...ती चांगली रणनीती सिद्ध होणार नाही

अनेक राज्यांतील काँग्रेस नेतृत्व पोकळीचे बळी आहे. त्यामुळे ती जागा भरून काढण्यासाठी प्रादेशिक पक्ष प्रयत्नशील आहेत. समविचारी पक्षांसोबत व्यापक युती करणे अवघड असले तरी अशक्य नाही. २०२४ च्या निवडणुकीत आपला पराभव झाला तर उदारमतवादी लोकशाहीचा आत्माही नष्ट होईल. सॉफ्ट हिंदुत्वासोबत जाणे ही चांगली रणनीती सिद्ध होणार नाही. कारण, अशा परिस्थितीत लोक भाजपच्या ‘कठोर हिंदुत्वा’कडे जातील, असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com