उद्धव ठाकरेंनी विधानसभेत यायला हवे होते; पृथ्वीराज चव्हाणांचे मत

Prithviraj Chavan said, Uddhav Thackeray should have come to assembly
Prithviraj Chavan said, Uddhav Thackeray should have come to assemblyPrithviraj Chavan said, Uddhav Thackeray should have come to assembly

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्ह न करता विधानसभेत यायला हवे होते. आपला मुद्दा समोर ठेवून राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता भावनिक भाषण करून निरोप घेतला, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. (Prithviraj Chavan said, Uddhav Thackeray should have come to assembly)

सत्तेच्या खेळापलीकडे जगणारी, तत्त्वांना चिकटून राहणारी व्यक्ती म्हणून त्यांनी आपली प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. इतके लोक नाराज आहेत याची उद्धव यांना कल्पनाच नव्हती, असेही ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

Prithviraj Chavan said, Uddhav Thackeray should have come to assembly
उद्धव ठाकरेंना उत्तर द्यावे लागणार; राजीनाम्यानंतर नवनीत राणांचा टोला

बंडाच्या धक्क्यातून ते बाहेर आलेले नाही. माझ्याच माणसांनी विश्वासघात केला असे ते सांगत आहे. खाली काय सुरू आहे ते त्यांना माहिती नव्हते. हे नेतृत्व कौशल्यावर प्रश्न उपस्थित करतो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आता लढण्याची इच्छा नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

निकालात स्पष्टता नाही

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल गोंधळात टाकणारा आहे. या निकालात स्पष्टता नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे वाट बघायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनीही सभागृहात येऊन राजीनामा द्यायला हवा होता. विरोधी पक्षनेत्याबरोबरच अन्य काही नेत्यांनाही बोलण्याची संधी मिळाली असती, असेही चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan said, Uddhav Thackeray should have come to assembly
...ही शिवसेनेच्या भव्य विजयाची सुरुवात; संजय राऊतांचे पुन्हा ट्विट

...हे माझे वैयक्तिक मत

विधानसभेच्या अधिवेशनात बोलण्याची संधी मिळाली असती तर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही सरकार स्थापनेचा निर्णय का घेतला हे सांगता आले असते. मात्र, उद्धव ठाकरे यांना आता लढण्याची इच्छा नाही. त्यांनी लढायला हवे होते, हे माझे वैयक्तिक मत असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. फेसबुक लाईव्ह आणि विधिमंडळात बोलणे यात फरक आहे. ते विधिमंडळात जे बोलले असते ते रेकॉर्डवर असते, असेही चव्हाण म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com