

Maharashtra Jio University
ESakal
नागपूर : नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक विधेयके मांडण्यात आली. महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे (स्थापना आणि नियमन) कायदा, २०२३ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र विधिमंडळात एक महत्त्वाचे विधेयक (असेंब्ली बिल क्र. ९९, २०२५) मांडले आहे. या विधेयकाचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यात 'जिओ विद्यापीठ' स्वयं-वित्तपुरवठा विद्यापीठ म्हणून स्थापन करण्यास परवानगी देणे आहे.