Pune University: PRN खुला होणार 'ते' विद्यार्थीही परीक्षा देणार; विद्यापीठाच्‍या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदा

Pune University
Pune Universityesakal

Pune University: सत्र पूर्तता संपलेल्‍या शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासूनच्‍या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांचे ‘पीआरएन’ क्रमांक खुले करण्यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे परवानग्‍यांचे सोपस्‍कार पूर्ण केले आहेत.

विविध अभ्यासक्रमांतील पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यांतील एकूण नव्वद हजार विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्‍या या निर्णयामुळे परीक्षा देत पदवी मिळविता येणार आहे. (PRN will be open by pune university and students from 2013 14 will also take exam news)

विविध विद्यार्थी संघटनांतर्फे या संदर्भात आवाज उठविताना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. विशेषतः कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्‍याने त्‍यांना परीक्षेला सामोरे जाण्याची अतिरिक्‍त संधी मिळावी, अशी भावना व्‍यक्‍त होत होती.

यासंदर्भात कुलगुरू, व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य आणि परीक्षा विभागप्रमुखांनी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) तसेच इतर संबंधितांशी पत्रव्यवहार करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. आता संधी मिळाली असल्‍याने विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत परीक्षेत यशस्‍वी कामगिरी करत पदवी प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

केवळ ‘या’ विद्यार्थ्यांना फायदा

त्‍यानुसार केवळ विधी अभ्यासक्रमांनाच नाही, तर सरसकट सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना निर्णयाचा फायदा होणार आहे. अंतिम वर्ष व त्‍याआधीच्‍या वर्षात अनुत्तीर्ण असलेल्‍या विद्यार्थ्यांनाच या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Pune University
Pune University : सत्र पूर्तता संपलेल्यांना शेवटची संधी; ३५ हजार विद्यार्थ्यांना होणार फायदा

निर्णयाचा संभाव्‍य लाभ होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अशी- (२०१३ पॅटर्ननुसार)

बीए- ४१ हजार
बी. कॉम.- ३१ हजार २८८
बी. एस्सी- सात हजार ९८६
बीसीए- एक हजार २२९
एम. कॉम.- दोन हजार ५१५
विधी- सुमारे सात ते आठ हजार

'‘पीआरएन’च्‍या विषयासंदर्भात सर्वप्रथम बी. एड.च्‍या विद्यार्थिनी येऊन भेटल्‍या. त्‍यानंतर विधीसह इतर शिक्षणक्रमांतील विद्यार्थ्यांची यादी वाढत गेली. साधारणतः पाच महिन्‍यांपासून या प्रश्‍नावर पाठपुरावा सुरू होता. परीक्षा विभागाने कुशलपणे माहिती संकलित करत मांडणी केली. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी यूजीसीकडे पाठपुरावा केला. ॲकॅडमीक कौन्सिलची परवानगी मिळवली. त्यामुळे विद्यार्थी हिताचा निर्णय होऊ शकला." - सागर वैद्य, व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Pune University
Pune University: पुणे विद्यापीठातील भिंतींवर मोदींविषयी आक्षेपार्ह मजकूर, गुन्हा दाखल करण्याची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com