esakal | दिव्यांगांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार - धनंजय मुंडे
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay-Munde

दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचे विविध प्रश्‍न प्राधान्याने सोडवण्यासंदर्भात दिव्यांग हक्क विकास मंचाच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेवरून सामाजिक न्याय विभागामार्फत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वेबिनार बैठकीमध्ये सामाजिक न्याय विभागाचे सचिव शाम तागडे, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सहसचिव दिनेश डिंगळे आदी सहभागी झाले होते.

दिव्यांगांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार - धनंजय मुंडे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - दिव्यांग हक्क विकास मंचाच्या कामांना गती देणार असून त्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार असल्याची ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचे विविध प्रश्‍न प्राधान्याने सोडवण्यासंदर्भात दिव्यांग हक्क विकास मंचाच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेवरून सामाजिक न्याय विभागामार्फत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वेबिनार बैठकीमध्ये सामाजिक न्याय विभागाचे सचिव शाम तागडे, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सहसचिव दिनेश डिंगळे आदी सहभागी झाले होते. मार्चपासून कोरोनामुळे मंदावलेल्या कामांना वेग देण्याबाबत मुंडे यांनी संबंधितांना सूचना केल्या. कामांचा आढावा दर आठवड्याला सादर करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्यात वाहन करामध्ये सवलत मिळाल्यामुळे वाहतूकदारांमध्ये उत्साह

दहा जिल्ह्यांमध्ये आवश्‍यक साहित्य
अमेरिकेच्या ‘स्टार की फाउंडेशन ही संस्था व अमेरिका व सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, ज्येष्ठ नागरिकांना विविध आवश्‍यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil