मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असून, याबाबतचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना दिली.

सांगली : राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असून, याबाबतचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना दिली.

पाटील म्हणाले, मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. तरी याबाबत आमचे काम सुरू आहे. तसेच ते पुढे म्हणाले, सध्या निवडणुकांचे वातावरण असल्याने गैरसमज पसरवले जात आहेत, असा टोला लगावत संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे हे दहा वर्षांपूर्वीचे आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सेना-भाजप युतीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मी जे बोलतो ते होतेच'. 

Web Title: Process to withdraw FIR against Maratha protesters says Chandrakant Patil