'म्होरक्या'चे निर्माते कल्याण पडाल यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

38 वर्षीय कल्याण पडाल यांनी सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कल्याण पडाल यांना आतड्याचा कर्करोग झाला होता. तसेच त्यांना काविळची लागणही झाली होती. या सततच्या आजाराला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'म्होरक्या'चे निर्माते कल्याण पडाल यांनी आत्महत्या केली. कल्याण पडाल यांनी कर्करोगाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या मृत्युमुळे चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. 

38 वर्षीय कल्याण पडाल यांनी सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कल्याण पडाल यांना आतड्याचा कर्करोग झाला होता. तसेच त्यांना काविळची लागणही झाली होती. या सततच्या आजाराला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.  'म्होरक्या' या कल्याण पडाल यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रक्षेकांमध्ये मोठी उत्सुकता होती.

Web Title: Producer of Film Mhorkya Kalyan Padal suicide