esakal | महाराष्ट्रात राष्ट्रवादाची प्रेरणा वारकरी संप्रदायात दडली आहे : प्रा.डॉ.प्रकाश पवार

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रात राष्ट्रवादाची प्रेरणा वारकरी संप्रदायात दडली आहे : प्रा.डॉ.प्रकाश पवार
महाराष्ट्रात राष्ट्रवादाची प्रेरणा वारकरी संप्रदायात दडली आहे : प्रा.डॉ.प्रकाश पवार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अंधारयुगाला छेद देत विवेकी, ज्ञानी विचार पुढे ठेवून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. कणखर लोकांच्या प्रत्नांमुळेच या राज्याची यशस्वी स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराज ते यशवंतराव चव्हाणां पर्यंत अनेकांनी हा महाराष्ट्र उभा केला. आजच्या सकलजनवादी महाराष्ट्राच्या राष्ट्रवादाची प्रेरणा वारकरी संप्रदायात दडली आहे. संतानी बहुविध गोष्टींनी सांगितलेला महाराष्ट्र हे आपल्या देशाचं महत्त्वाचं अंग आहे.असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक प्रा.डॉ.प्रकाश पवार यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळ माध्यम समूहाचे यीन (यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क) आयोजित संयुक्त महाराष्ट्राची जडणघडण,सद्यस्थिती व युवकांचा सहभाग या विषयावर यिन संवाद कार्यक्रमात वेबिनार मध्ये बोलत होते.

पवार म्हणाले, मुंबई महाराष्ट्राची आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांनी भुमिका मांडली. महाराष्ट्राची एक सांस्कृतिक विण विणली गेलेली आहे. मुंबई ते नागपुर आणि खानदेश ते कोकण अशा विस्तिर्ण महाराष्ट्राला मोठ्ठा सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. लोकमान्य टिळकांनी राष्ट्राभिमानी महाराष्ट्राची मांडणी केली. तर महात्मा फुलेंनी शेतकरी युक्त महाराष्ट्राच रुप उभा केला. पंडीत नेहरुंनी थेट प्रतापगढावर येत महाराष्ट्राच्या अस्तित्वाला मान्यता देणं आणि शिवाजी महाराजांना देशाचं प्रतिक मानणं. हे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी घडवुन आणले.अनेक विद्वानांनी हा महाराष्ट्र उभा केला आहे. सामाजिक ऐक्य व सलोखा हे राज्यांचे मुख्य वैशिष्ट्यं आहे.

हेही वाचा- अभिमानास्पद! पोलिस महासंचालकांचे सन्मान पदक २६ जणांना; तीन अधिकाऱ्यांसह २३ कर्मचाऱ्यांचा समावेश

संयुक्त महाराष्ट्रात शेती,उद्योगाचा संतुलीत मेळ घालत राज्यकर्त्यांनी राज्य पुढे नेले. राज्य उभारणीची ती एक क्रांती होती. यशवंतराव चव्हाणांनी राज्यातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व दिले.पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना झाल्याने सत्तेचे विकेंद्रीकरण झाले. लोकशाही महाराष्ट्राचा मोठ्ठा टप्पा होतो. हवं ते मिळवण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे परंतू अलीकडच्या काही दशकात राज्यातील नेतृत्वात एकी राहिली नाही. त्यामुळे विविध स्तरावर महाराष्ट्राला याचा फटका बसला.

एकसंघ राज्याच्या संकल्पनेला पुरक पाठिंबा देत युवकांनी राजकारण,समाजकारणात यायला हवं. राजकारण हे करीअर नसुन एक समग्र नेतृत्व असते. राष्ट्राला उभे करण्याची ताकद युवकांमध्ये असते. त्यादृष्टीने त्यांनी पावले टाकावीत असे आवाहन ही पवार यांनी यावेळी केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन यशस्वी शिंदे व मानसी कुंचिकोरवी यांनी केले. यावेळी यिनचे सदस्य ओंकार कागिनकर, पार्थ देसाई, सृष्टी दानोळे, मृण्मयी बेंडके, पराग हिर्डीकर, ऋतुजा पाटील आदी सहभागी होते.आभार विशाल पाटील यांनी मानले. वेबिनारचे आयोजन यिन समन्वयक अवधूत गायकवाड यांनी केले.

Edited By- Archana Banage