प्राध्यापक भरती प्रक्रियेला खीळ

Professor
Professor

पुणे - राज्य सरकारकडून उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरण्यात येत असलेल्या ६५९ प्राध्यापकांच्या भरतीच्या रोस्टरचे काम विद्यापीठांनी पूर्ण केलेले नसल्याने या भरती प्रक्रियेला खीळ बसली आहे. राज्यातील १५ पैकी केवळ दोन विद्यापीठांनीच ही माहिती सादर केली आहे.

ऐकीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याची आरोड होत असताना दुसरीकडे विद्यापीठांची उदासीनता समोर आली आहे. 

राज्यात मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोखले अर्थशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज अभिमत यासह १२ अकृषी विद्यापीठांमधील रिक्त पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. 

या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची एकूण २ हजार ५३४ मंजूर पदे आहेत. त्यापैकी १ हजार ३८८ पदे भरलेली आहेत. १ हजार १६६ पदे रिक्त आहेत. ही रिक्तपदे एकाच वेळी भरणे शक्‍य नसल्याने सरकारने ४० टक्के रिक्त पदांची भरती करण्यास मान्यता दिली होती. या विद्यापीठांमधील ६५९ पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com