‘चाइल्ड पोर्नोग्राफी’बाबत कडक शिक्षेची तरतूद - अनिल देशमुख

Anil-Deshmukh
Anil-Deshmukh

मुंबई - महिला अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी राज्यात करण्यात येणाऱ्या नवीन कायद्यांतर्गत लहान मुलांच्या अश्लील व लैंगिक अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्याच्या गुन्ह्यांचाही (चाइल्ड पोर्नोग्राफी) समावेश करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. 

‘चाइल्ड पोर्नोग्राफी’विरोधील कारवाईमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर असून, आत्तापर्यंत १२५ गुन्ह्यांमध्ये ४० जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. देशमुख म्हणाले, ‘‘चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाई करण्यासाठी ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरो''ने (एनसीआरबी) प्रत्येक राज्यात नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली असून, राज्यात महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाई करण्यासाठी १८ डिसेंबर २०१९ पासून राज्यभरात ‘ऑपरेशन ब्लॅक फेस’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आत्तापर्यंत ४० जणांना अटक करण्यात आली असून, देशभरात अशा स्वरूपाच्या कारवायांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर कर्नाटक आहे.’’

या लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य ॲड. आशिष शेलार, योगेश सागर, राम कदम, रईस शेख यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com