
सांगली: एसटीचे कर्मचारी न्याय, हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. त्यांचा संप मोडण्यासाठी खासगी प्रवासी वाहनांना थेट एसटी स्थानकावर प्रवेश दिला आहे. हे भूमिपुत्रांमध्ये भांडण लावून तमाशा बघण्याचे सरकारचे हीन राजकारण सुरु आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार (Pruthviraj Pawar) यांनी केला.
ते म्हणाले, ‘‘एसटी कर्मचाऱ्यांनी इतकी वर्षे रात्रंदिवस काबाडकष्ट केले. कमी पगारात राबले. डबल ड्युटी केल्या. अनेकदा पगार झाले नाहीत, तरी कुरकूर केली नाही. त्यांची दिवाळी आगारात व्हायची आणि घरात दुःखाचा प्रसंग घडला असेल तर ते शेकडो किलोमीटरवर प्रवासी पोहचवण्यासाठी गेलेले असायचे. या संकटात पिचलेल्या तीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. इतके सगळे घडल्यानंतरही सरकार त्यांच्याकडे सहानुभुतीने पाहणार नसेल तर संघर्ष अटळ होता आणि तोच आता सुरु आहे. आम्ही पक्ष म्हणून नव्हे तर कष्टकऱ्यांचे साथीदार म्हणून मैदानात उतरलो आहोत. मी आणि आमचे कार्यकर्ते पहाटे चारपासून एसटी स्थानकात थांबून कर्मचाऱ्यांना साथ देत आहोत.’’
ते म्हणाले, ‘‘राज्य शासनाने इतकी वर्षे वेळकाढूपणा केला, अनेक आंदोलने गोड बोलून मोडून काढली, त्यामुळे आता सरकारवरचा विश्वास उडाला आहे. परिणामी, निर्णयाशिवाय माघार नाही, असे धोरण आहे. या स्थितीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूकीसाठी थेट एसटी फलाटावर पाठवणे म्हणजे भूमिपुत्रांत भांडण लावून तमाशा बघण्यासारखे आहे. आम्ही याचा निषेध करतो. प्रवेशांना या स्थितीची जाणीव आहे. त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी खाकी कपड्यांतील एसटीवाले राबत आले आहेत. काही दिवस त्यांच्या आयुष्याच्या प्रश्नासाठी प्रवासीही साथ द्यायला तयार आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.