तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या जयंत पाटलांचे ताळतंत्र सुटलंय

जयंत पाटलांचे ताळतंत्र सुटलेय; चंद्रकांतदादांचा पाठीवर हात हाच सोन्याचा मुकुट
जयंत पाटलांचे ताळतंत्र सुटलेय; चंद्रकांतदादांचा पाठीवर हात हाच सोन्याचा मुकुट Google

सांगली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) एका मील कामगाराचे वारस आहेत. त्यांना सत्ता आली काय अन् गेली काय, फार फरक पडत नाही. तोंडात सोन्याचा चमका घेऊन जन्माला आलेल्या जयंत पाटील (Jayant Patil) यांना मात्र सत्तेशिवाय झोप लागत नाही. सत्ता गेल्यानंतर त्यांची तडफड सुरु होती आणि आता पात्रता नसताना पुन्हा सत्ता आल्यानंतर त्यांचा ताळतंत्र सुटला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार (Pruthviraj Pawar) यांनी आज केली.  

ते म्हणाले, ‘‘जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांवर टीका करण्यापेक्षा एवढ्या वर्षांच्या मंत्रीपदात जिल्ह्यासाठी काय दिवे लावले, याचे उत्तर द्यावे. त्यांचे नाव आले की घोडेबाजार, कुरघोड्या, करेक्ट कार्यक्रम, जिरवाजिरवी हेच मुद्दे येतात. राज्यातील जनतेने जयंतरावांना आणि त्यांच्या पक्षाला स्पष्टपणे नाकारल्याचे त्यांची आमदार संख्या ओरडून सांगते. जुगाड करून ते सत्तेत आले. ही सत्ता पचता पचेना. अनेक नेत्यांची सदसद्विवेकबुद्धी खड्ड्यात गेली आहे. संकटांनी जनता होरपळली आहे. मात्र, शंभर कोटी वसुली, मारहाण, मंत्र्याच्या पत्नीला अडकावणे, अशात व्यस्त आहेत. डोक्यात सत्तेची हवा आहे. त्यात जयंतराव आघाडीवर आहेत. महापालिकेतून नागरिकांनी त्यांचे पार्सल दोनवेळा अनवाणी परत पाठवले. आता सरळ सत्ता येत नाही म्हटल्यावर घोडेबाजार करून महापौर केला आहे. त्याची परतफेड व्याजासह होईल.’’

ते म्हणाले, ‘‘चंद्रकांतदादा राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत मोठे झाले. स्वतःच्या हिमतीवर अभाविप आणि संघाच्या शिस्तीत नैतिकतेच्या बळावर राज्याचे महसूल मंत्री झाले. कर्तबगार, निष्कलंक राहिले. छळ-कपट, विश्वासघात केला नाही. चंद्रकांतदादांचा पाठीवर हात हाच आमच्यासाठी सोन्याचा मुकुट आहे. पाठीवर हात ठेवून खंजीर खुपसण्याची तुमची वृत्ती आहे.’’  

विश्‍वासार्हता कुठाय?

पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘जिल्ह्यात जयंत पाटील यांची विश्वासार्हती संपली आहे. घोडेबाजार, कुरघोड्या, वापरा आणि फेकून द्या प्रवृत्तीवर कोण विश्‍वास ठेवणार? त्यांचे हे राजकारण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोडून काढू.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com