महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर (व्हिडिओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज (ता.06) चैत्यभूमीवर जावून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावड़े, केंद्रिय मंत्री नितिन गडकरी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यानी अभिवादन केले. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी आज चैत्यभूमीवर अलोट गर्दी केली होती.

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज (ता.06) चैत्यभूमीवर जावून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावड़े, केंद्रिय मंत्री नितिन गडकरी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यानी अभिवादन केले. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी आज चैत्यभूमीवर अलोट गर्दी केली होती.

बाबासाहेबांचे अनुयायी राज्यभरातून गेल्या तीन दिवसांपासून चैत्यभूमिवर गर्दी करत होते. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतचे सर्वच रस्ते अनुयायांनी भरले आहेत. महापरिनिर्वाणदिनानिमीत्त येणाऱ्या अनुयायांसाठी अनेक सामाजिक संस्था, संघटनांकडून मोफत भोजनदानाची व्यवस्था चैत्यभूमीवर करण्यात आली आहे.

तसेच, मुंबई महापालिका आणि बेस्ट उपक्रमाने उत्तमरित्या सोयी करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक प्रकारच्या आवश्यक सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच यावेळी दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी दादर रेल्वे स्थानकाजवळ भीमआर्मी संघटनेने निदर्शने केली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: public on Chaityabhoomi to greet the Dr. Babasaheb Ambedkar