सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा : सर्वोत्कृष्ट मंडळाला ५ लाखांचा पुरस्कार; सरकारची घोषणा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय आहेत नियम जाणून घ्या
lalbuage raja
lalbuage raja
Updated on

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ५ लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आता २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (Public Ganeshotsav Competition Award 5 Lakhs for best mandal announcement by Govt)

lalbuage raja
धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड
lalbuage raja
'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

यास्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन सांस्कृतीक कार्य विभागाकडून करण्यात आलं आहे. यापूर्वी अर्ज करण्याची मुदत ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत होती ती वाढवून आता २ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. या पुरस्कारांनुसार स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मंडळाला ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ लाख ५० हजार तर तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपयांचं परितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच जिल्हावार प्रथम येणाऱ्या मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे.

lalbuage raja
मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

स्पर्धेचे नियमक काय आहेत?

१) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांना धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणं आवश्यक

२) किंवा स्थानिक पोलीस ठाणए अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी असणं आवश्यक

३) स्पर्धेत सहभागासाठी www.pldeshpandekalaacademy.org या वेबसाईटवर What is news या सेक्शनमध्ये अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

४) हा अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर २ सप्टेंबर २०२२ पर्यंत पाठवावेत

५) मंडळांची निवड जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com