...तर जनताच तुम्हाला जागा दाखवेल : पाटील 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

कोल्हापूर : "मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, म्हणून सत्ताधारीच व्यूहरचना करत आहेत, असा आरोप करत मराठा समाजाला लवकर आरक्षण जाहीर करा. अन्यथा जनता तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी येथे दिला. 

पाटील म्हणाले, "कोल्हापूर जिल्ह्याचा दहा वर्षे पालकमंत्री होतो. त्या वेळी कोणाचा आवाज दाबला नाही, कोणावर अन्याय केला नाही. पालकमंत्र्यांची काय भूमिका असते, हे दाखवून दिले. आता मात्र दडपशाहीचा मार्ग अवलंबला जात आहे. मी तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. आम्ही सत्तेत असताना मराठा समाजाला 16, तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिले होते. अन्य समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले होते. समाजातील गरीब माणसांसाठी आम्ही काम केले.'' 

चार वर्षांत आत्महत्या वाढल्या 
चार वर्षांत साडेतेरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील बहुतांशी शेतकरी हे मराठा समाजातील होते. आजही मराठा समाजातील लोक गिरणी कामगार, माथाडी मोलमजुरी करून जगत आहेत, असे पाटील यांनी सांगितले. 

Web Title: public will show you the place: Patil