पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत यलो अलर्ट कायम

पुणे शहरात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावासाचा इशारा शुक्रवारीही (ता. १४) कायम आहे.
rain
rainsakal
Summary

पुणे शहरात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावासाचा इशारा शुक्रवारीही (ता. १४) कायम आहे.

पुणे - शहरात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावासाचा इशारा शुक्रवारीही (ता. १४) कायम आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला असून, मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत यलो अलर्ट कायम आहे.

गुरूवारी सकाळपासूनच शहरातील बहुतेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. सर्वाधिक पावसाची नोंद चिंचवड परिसरात १३ मिलीमिटर येवढी झाली. शुक्रवारीही आकाश अंशतः ढगाळ राहून, दुपारनंतर मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

कोमोरिन आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात कोकण, गोव्याच्या किनाऱ्यालगत ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. गेले काही दिवस विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने दणका दिला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वायव्य भारतातून ३ ऑक्टोबर रोजी परतले. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा शुक्रवारी (ता. १४) कायम होती. माघारीस पोषक वातावरण होत असल्याने दोन दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. तर त्यानंतरच्या पुढील दोन दिवसांत संपूर्ण गुजरातसह महाराष्ट्र, पूर्व भारताच्या काही भागांतून मॉन्सून माघार घेण्याचे संकेत आहेत.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

  • कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

  • मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com