सोमय्यांनी आरोप केलेले कंत्राटदार म्हणतात, 'हे बिनबुडाचे राजकीय आरोप'

Kirit Somaiya
Kirit SomaiyaSakal
Updated on

पुणे: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा पुणे दौरा चांगलाच गाजला आहे. मागील आठवड्यातील शनिवारी ते पुण्यात आले असता त्यांना शिवसैनिकांनी पुणे महापालिकेमध्ये धक्काबुक्की केल्याची घटना घडली. ते ज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणासंदर्भात पुणे आयुक्तांना भेटायला आले होते, तो मुद्दा काही काळ बाजूलाच राहिला आणि राजकीय शक्ती प्रदर्शन महत्त्वाचे होऊन बसले. यातूनच गेल्या शनिवारी पुन्हा एकदा सोमय्या पुणे महापालिकेत आले आणि परवानगी नसतानाही भाजपने शक्ती प्रदर्शन करत त्यांचा त्या पायऱ्यांवर सत्कार केला ज्यावरुन ते कोसळले होते. दुसरीकडे आता या सगळ्या प्रकरणात त्यांनी ज्यांच्यावर बनावाचे आरोप केले होते ते सुजीत पाटकर आता माध्यमांसमोर आले आहेत. आणि त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Kirit Somaiya
'मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटींचा बँक फ्रॉड'

काय आहेत सोमय्यांचे आरोप?

किरीट सोमय्या यांनी असा आरोप केला होता की, सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलूंड येथील कोव्हिड केंद्रांवर सुजीत पाटकर यांच्या कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर्स पुरवले जायचे. या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.

सुजीत पाटकर हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचाही त्यांनी दावा केला आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की, सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन केली आणि तिच्या माध्यमातून मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट मिळवले आहे. मात्र आता ज्यांच्यावर आरोप होत आहेत ते सुजित पाटकर समोर आले असून, त्यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटलंय.

Kirit Somaiya
'हिजाब न घातल्याने महिलांवर बलात्कार होतो', काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

हे आरोप राजकीय असून याचा वास्तवाशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच आपला राऊतांशी काहीही संबंध नाही, लाईफलाईन कंपनी बोगस असल्याचा सोमय्यांनी भ्रम तयार केला आहे. कुणीही मदत करत नव्हतं तेंव्हा आम्ही सेवा दिली आहे. रुग्ण बरे झाल्यावर आमचे आभार मानतात. किरीट सोमय्यांनी केलेले आरोप साफ खोटे असून ते बदनामी करण्यासाठीचं कारस्थान आहे. पैसा-प्रसिद्धीसाठी आम्ही काम केलेलं नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com