भाजपाचे हर्षवर्धन पाटील यांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून

माजी मंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता ही आता ठाकरे घराण्याची सून होणार आहे.
अंकिता पाटील-निहार ठाकरे
अंकिता पाटील-निहार ठाकरेSakal

पुणे : माजी मंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची लेक आंकिता ही आता ठाकरे घराण्याची सून होणार आहे. बिंदूमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार यांच्याशी येत्या २८ डिसेंबरला विवाह होणार आहे. निहार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. निहार यांचे वडिल बिंधूमाधव यांचे 1996 मध्ये अपघाती निधन झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव हे निहार यांचे सख्खे काका तर राज हे चुलतकाका आहेत. निहार यांचे एलएलएम पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी वकिली व्यवसायात जम बसविला आहे. या विवाहाच्या निमित्ताने ठाकरे आणि पाटील अशी दोन राजकीय घराणी एकत्र येणार आहेत.

अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तर अंकिता यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि एक वर्ष हार्वर्डमध्येही शिक्षण घेतले आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या त्या सदस्या आहेत. गेले काही दिवस या दोघांच्या विवाहाची चर्चा होती. त्याची अधिकृत माहिती आज जाहीर झाली.

हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची या निमित्ताने भेट घेतली आणि त्यांना विवाहाचे निमंत्रण दिले. मुंबईत येत्या 28 डिसेंबर रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा होणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी `सरकारनामा`शी बोलताना दिली. विवाहाच्या निमित्ताने पाटील यांचे मूळ गाव असलेल्या बावडा येथेही गावकऱ्यांसाठी थाटामाटाने भोजनसोहळा 17 डिसेंबर रोजी होणार आहे.

महाराष्ट्रात अनेक राजकीय कुटुंबात सध्या विवाहाची धामधूम पार पडली. त्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घरात लग्नकार्ये पार पडली. आता वधूपिता पाटील यांच्या घरात लग्नाची धावपळ सुरू आहे. त्यानिमित्त ते विविध नेत्यांच्या गाठीभेट घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com