'मुद्रा'तून कर्जरक्कम घेण्यात पुणे आघाडीवर 

'मुद्रा'तून कर्जरक्कम घेण्यात पुणे आघाडीवर 

सोलापूर : सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नवउद्योगासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून यावर्षी राज्यातील 17 लाख 74 हजार 546 जणांना आठ हजार 938 कोटी 27 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. कर्जदारांमध्ये राज्यात सोलापूर अव्वल, तर कर्ज रकमेत पुणे प्रथम क्रमांकावर आहे. 

जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मायक्रो फायनान्ससह राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून उद्योगासाठी 50 हजारांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. यंदा या योजनेतून सोलापूर जिल्ह्यात एक लाख 34 हजार 545 नवउद्योजकांना 524.15 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. पुणे जिल्ह्यात एक लाख 30 हजार 104 जणांना 969.93 कोटी, तर नागपूर जिल्ह्यात एक लाख 33 हजार 786 जणांना 520.2 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात 94 हजार 890 जणांना 527.88 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याची माहिती अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक आर. डी. चंदनशिवे यांनी दिली. 

राज्याची स्थिती 
शिशुगट 
कर्जदार : 16 लाख 14 हजार 774 
कर्जवाटप : 4 हजार253.03 कोटी 
किशोर गट 
कर्जदार : 1 लाख 29 हजार 450 
कर्जवाटप : 2 हजार 469.96 कोटी 
तरुण गट 
कर्जदार : 30 हजार 322 
कर्जवाटप : 2 हजार 215.01 कोटी 

नवउद्योजकांना उद्योग निर्मितीसाठी बॅंकांच्या माध्यमातून पुरेसे अर्थसाह्य केले जाते. कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करावा आणि वेळेत परतफेड करावी, जेणेकरून त्यांची बॅंकांमध्ये पत कायम राहील. मागील दोन-तीन वर्षांच्या तुलनेत थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. 
- आर. डी. चंदनशिवे, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, सोलापूर 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com