Pune Crime: पुणेकरांना दिलासा! गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृह विभागाने आखली मोठी योजना

पुण्यात आता कायद्याचा वचक
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal

Devendra Fadnavis: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. वेगवेगळ्या भागात गुन्हेगांरांच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. खून, चोरी, अपहरण, बलात्कार, कोयता गँग, अशा प्रकारे पुण्यात गुन्हेगारी फोफावत आहे.

मात्र आता यावर घटनांवर राज्य सरकार आक्रमक झालं आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याला गुन्हेगारी पासून बाहेर काढण्यासाठी मोठी योजना आखली आहे.

Devendra Fadnavis
HSC Exam Paper : बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी पेपरमध्ये चूक

त्यामुळे पुण्यात आता कायद्याचा वचक बसणार आहे. पुणे शहरावर नजर ठेवण्यासाठी आता एक लाख सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत, तर पुण्यासाठी १००० पोलिसांची नवी भरती देखील करण्यात येणार आहे.

या सोबतच पिंपरी-चिंचवडसाठी वेगळे आयुक्तालय उभारण्यात येणार असल्याची माहिती भाजपा महाराष्ट्र यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis
Political News : उद्या 'ते' बाळासाहेबांची बसण्याची जागाही घेऊन जातील; NCP नेत्याची घणाघाती टीका

दरम्यान मागील काळात मोठ्या प्रमाणात गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. मागील काळात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे शहरातील कोयता गँग आणि वाढत्या गुन्हेगारीवर विधानसभेत लक्ष वेधून घेतले होते.

त्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवून कोयता गँगच्या मोहक्यांना शोधून त्यांची भर चौकातून धिंड काढली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com