Mahadev Jankar : भाजपसोबतचा युतीधर्म लोकसभा, विधानसभेसाठी

कसबा विधानसभा पोट निवडणुकीतील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत जानकर यांनी संवाद साधला.
Mahadev-jankar
Mahadev-jankarsakal
Summary

कसबा विधानसभा पोट निवडणुकीतील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत जानकर यांनी संवाद साधला.

पुणे - प्रत्येक पक्षाला त्यांचे संघटन मजबूत करण्याचा अधिकार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आम्ही युतीधर्म निभावणार आहोत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर आमचे उमेदवार उभे राहतील, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.

कसबा विधानसभा पोट निवडणुकीतील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत जानकर यांनी संवाद साधला. भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख अजय भोसले उपस्थित होते.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक पुन्हा लढविणार का असे विचारले असता जानकर म्हणाले, ‘‘मी आत्ता कसब्याच्या पोटनिवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आलो आहे. मी लोकसभेला उमेदवार असताना हेमंत रासने यांनी माझ्यासाठी काम करून मदत केली होती, त्यामुळे त्यांचा प्रचार करतो, बारामतीबाबतची भूमिका नंतर जाहीर करेण.

आमदार गोपीचंद पडळकर भाजपमध्ये आल्याने भाजप तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे का ? असे विचारले असता जानकर म्हणाले, मी सध्या प्रसार माध्यमांपासून लांब आहे.पण माझे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. पक्षाचा विस्तार राज्यासह परराज्यातही सुरू आहे. पडळकर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. महाराष्ट्र गुजरातसह विविध राज्यात माझ्या पक्षाची ताकद आहे.

आजवर माझ्या पक्षाचे चार आमदार निवडून आले आहेत. पक्ष वाढवण्यासाठी मी ४० वर्षे घरी गेलो नाही. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तरी मी मंत्रिपद मागणार नाही. पण भाजपला गरज वाटली‌ तर ते मला मंत्री करतील. आमची भाजपसोबत युती असून, युतीधर्म पाळण्यासाठी मी माझा पक्ष कसब्यात काम करत आहे.

पहाटेचा शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल विचारले असता जानकर म्हणाले, ‘‘शरद पवार व देवेंद्र फडणवीस हे मोठ्या उंचीचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. त्यांच्या उंचीवर मी जेव्हा पोहचेन तेव्हा बोलेन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com