राज्यात गारठा वाढला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पुणे - राज्यातील गारठा वाढत असून बहुतांश शहरांमधील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुढील तीन दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याचेही खात्यातर्फे बुधवारी सांगण्यात आले.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून गारठा वाढत आहे. सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद नगर येथे 11.6 अंश सेल्सिअस झाली. राज्याच्या बहुतांश भागात आकाश निरभ्र असल्याने हवेतील गारठा कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

शहरातील गारठा वाढला असून, किमान तापमानाचा पारा 14.2 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमान 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान अंशतः वाढेल, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

Web Title: pune maharashtra news cold increase