'यिन'च्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड; नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूरला रांगा

महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड; नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूरला रांगा
पुणे - राज्यात सलग दोन वर्षे यशस्वीरीत्या नेतृत्व विकास कार्यक्रम राबविल्यानंतर यंदा तिसऱ्या वर्षी महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मतदानाद्वारे होणाऱ्या महाविद्यालयीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकांना गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या टप्प्यात नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, नगर आदी प्रमुख शहरांतील महाविद्यालयांत उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली.

तरुणांचे नेतृत्वगुण विकसित व्हावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कोण होणार "यिन'चा मुख्यमंत्री, कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार, ही उत्सुकता मतदानादरम्यान सर्व महाविद्यालयांत दिसत होती. यातून निवडलेल्या महाविद्यालयीन प्रतिनिधींची जिल्हानिहाय कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. निवडलेले प्रतिनिधी हे राज्यस्तरावर स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात सहभागी होतील आणि त्यातूनच राज्याचे "यिन'चे मंत्रिमंडळ स्थापन होईल.

नागपूर विभाग
नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि वर्ध्यात उत्स्फूर्त मतदान
नागपूर जिल्ह्यात 11 महाविद्यालयांत निवडणूक
विदर्भातील 22 महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

औरंगाबाद विभाग
औरंगाबाद शहरात पाच महाविद्यालयांत मतदान
जालना जिल्ह्यातील दानकुँवर, मत्स्योदरी कॉलेजमध्ये ऑनलाइन मतदान
नांदेडला महाविद्यालय कर्मचाऱ्यांची अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य
परभणीत प्राचार्यांच्या हस्ते मतदान प्रक्रियेला सुरवात
हिंगोलीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या लक्षणीय

पश्‍चिम महाराष्ट्र
नगर शहर आणि परिसरातील 8 महाविद्यालयांत मतदान
सोलापूरमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला ऑनलाइन मतदानाचा अनुभव
साताऱ्यातील महाविद्यालयात मतदानासाठी रांगा
कोल्हापुरातील तीन महाविद्यालयांत प्रक्रिया
कोल्हापूर येथील न्यू कॉलेजमध्ये बिनविरोध निवड
सांगली आणि मिरजेत मतदान; 16 उमेदवार रिंगणात
पिंपरी- चिंचवडला युवकांत उत्सुकता; ऑनलाइनचाही अनुभव

Web Title: pune maharashtra news yin election