Sharad Pawar : 'इंदुरीकरांचं कीर्तन ऐकणार होतो, पण...' शरद पवारांनी बोलून दाखवली खंत

Sharad Pawar on Indurikar Maharaj
Sharad Pawar on Indurikar Maharajesakal

पुणेः विनोदी कीर्तनकार इंदुरीकर महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज एकाच कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाबद्दल भाष्य केलं.

पुण्यामध्ये कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती. याच कार्यक्रमामध्ये निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचंही कीर्तन झालं. परंतु पवारांना कीर्तनाला थांबता आलं नाही.

Sharad Pawar on Indurikar Maharaj
Nana Patole : बिनविरोध नाहीच! कसबा, चिंचवड निवडणुकीबाबत पटोलेंची मोठी घोषणा; घटकपक्षांबाबतही विधान

शरद पवार यांनादेखील इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आवडतं, हे स्पष्ट झालं आहे. ते म्हणाले की, संसंदेच्या अधिवेशनासाठी जायचं असल्यानं यावेळी कीर्तन ऐकता येणार नाही. ही खंत आहे परंतु पुढच्या वेळी नक्कीच कीर्तनाचा लाभ घेऊ.

इंदुरीकर महाराजांचा राज्यभर चाहता वर्ग आहे. अस्सल ग्रामीण शैली, चपखल विनोद आणि कोट्या करण्याची हातोटी. यामुळे त्यांच्या कीर्तनाला हजारो लोकांची उपस्थिती असते. मध्यंतरी महिलांबद्दलच्या विधानामुळे ते अडचणीत सापडले होते. तरीही राज्यभर त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम सुरुच होते.

Sharad Pawar on Indurikar Maharaj
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाराला 10 लाखांचं बक्षिस; भाजपच्या 'या' नेत्याचं विधान

खुद्द शरद पवार यांनाही इंदुरीकर महाराजांची कीर्तन आवडतात आणि आज त्यांना त्यांचं कीर्तन ऐकता न आल्याने पवारांनी खंत व्यक्त केली; यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com