मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

पुणे - अरबी सुमद्राच्या परिसरात अनुकूल स्थिती तयार होत असल्याने नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) हळूहळू पुढे सरकत आहे. यवतमाळपर्यंत दाखल झालेल्या मॉन्सूनने गुरुवारी विदर्भाचा आणखी काही भाग व्यापला. यामुळे विदर्भाच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. मध्य प्रदेशातील मांडला, बिहारमधील पाटणापर्यंत मॉन्सूनने आगेकूच केली असल्याचे हवामान विभागाने सांगितले. 

राज्यात मॉन्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असली तरीही पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मॉन्सून पोचेल, असा विश्‍वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

गेल्या आठवड्यात मॉन्सून गुजरातमधील वलसाड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, विदर्भातील बुलडाणा व यवतमाळपर्यंत दाखल झाला होता. मात्र, पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती नसल्याने त्याची वाटचाल धीम्या गतीने होती. अखेर गुरुवारी मॉन्सूनने विदर्भाचा अर्धा भाग व्यापला. चार ते पाच दिवसांत बिहार, मध्य प्रदेशचा पश्‍चिम भाग, उत्तर प्रदेशाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

सध्या पंजाबचा परिसर आणि हिमाचल प्रदेशाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. तसेच राजस्थानचा वायव्य भाग ते बंगाल उपसागराच्या वायव्य भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगालच्या दिशेने सरकत आहे. तसेच बिहार ते ओडिशाच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र आसाम ते बंगालचा उपसागर या भागाकडे सरकण्याची शक्‍यता आहे. 

अरबी समुद्राजवळही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग ते केरळकडे सरकत आहे. त्यामुळे देशातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण असून, तापमानात घट झाली आहे. 

पावसाचा अंदाज 
कोकणात येत्या दोन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. देशात येत्या दोन ते तीन दिवसांत राजस्थान, पश्‍चिम बंगाल, आसाम, मेघालयमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, त्रिपुरा, कोकण, गोवा, चंडीगड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ परिसरातही जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Web Title: pune news monsoon weather