राज्यात पावसाचा जोर कायम राहणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

पुणे - राज्यात पावसाचा जोर कायम असून, कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला. मध्य महाराष्ट्रात व विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात काही ठिकाणीच पाऊस हजेरी लावेल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले. 

गुजरातचा दक्षिण भाग ते लक्षद्वीप यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत पुढील दोन दिवसांमध्ये पाऊस पडेल; तर सोमवारी (ता. १७) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले. मंगळवार (ता. १८) आणि बुधवारी (ता. १९) कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यताही वर्तविली आहे.

उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तेथील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. राजस्थानचा पश्‍चिम भाग ते बंगालचा उपसागर यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा बंगालच्या उपसागराकडून राजस्थानच्या दिशेने सरकत असून छत्तीसगड आणि ओडिशाचा काही भाग हा पट्टा व्यापण्याची शक्‍यता आहे.

जम्मू आणि काश्‍मीर परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागांत रविवारी पावसाने हजेरी लागली. महाबळेश्‍वर येथे ५५ मिलिमीटर पाऊस पडला, तर बुलडाणा येथे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Web Title: pune news rain