esakal | किरण गोसावीला पुणे पोलिसांची लूक आऊट नोटीस जारी
sakal

बोलून बातमी शोधा

KP Gosavi

किरण गोसावीला पुणे पोलिसांची लूक आऊट नोटीस जारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : किरण गोसावीबाबत पुणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे. पुणे पोलीस गोसावीचा ताबा घेणार आहेत. पुण्यातील फरासखाना पोलिसात गोसावीच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. गोसावीचा ताबा घेण्यासाठी पुण्यातून पोलीस पथक रवाना झालं आहे.

हेही वाचा: 'पदावर रावणाची ‘शुर्पणखा’ नको'; चित्रा वाघ यांचं चाकणकरांच्या नियुक्तीबाबत खोचक ट्विट

कोण आहे किरण गोसावी?

अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान यास हाताला धरून नेणारा व त्याच्यासमवेत "सेल्फी' घेणारी ती व्यक्ती म्हणजे किरण गोसावी होय. ही व्यक्ती कोण आहे? असा प्रश्‍न अनेकांना पडला होता. त्यावरुन मोठी चर्चा झडली असतानाच आता संबंधीत व्यक्ती हि 2018 मध्ये पुण्यात फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आता पुढे येऊ लागली आहे.

हेही वाचा: ''मैं अपने दुश्मनों का बड़ा एहतराम करता हूँ'' - नवाब मलिक

आर्यन खान ड्रग्जच्या प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवला आहे. हाच साक्षीदार गोसावी याने पालघर तालुक्या मधील अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात कामाला लावतो असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.पुणे पाठोपाठ पालघरमधील तरुणांनाही त्याने परदेशात नोकरी देतो असे सांगून गंडा घातला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील उत्कर्ष तरे व आदर्श किणी या दोन तरुणांची त्याने दोन वर्ष आधी फसवणूक केली होती. या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपये गोसावी याने उकळली असल्याचे समोर आल्याने किरण गोसावी अडचणीत आला आहे.

loading image
go to top