

PM Modi, Abhijit Dipake
esakal
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनानंतर आज पुण्यात आंदोलन होत आहे. या आंदोलनात आज शिक्षणाविषक जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. मात्र कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्याबाबत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांची अमेरिकेत बैठक झाली आणि त्यानंतर दीपके भारतात आले, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले की, या बैठकीचे फोटो देखील एका व्यक्तीने मला पाठवले आहेत.