पुण्याच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा पुनश्च हरिओम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganeshvisarjan

पुण्याच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा पुनश्च हरिओम

कोविडच्या 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील 10 दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कोविडकाळानंतरचा पहिलाच गणेशोत्सव असल्यामुळे बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. शुक्रवारी सकाळी 10 वाजता पुण्यातील विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. तर सांगता शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास झाली. या 30 तासाच्या मिरवणुकीत मोठ मोठे डिजे पुणे शहरासह इतर परिसरात वाजत होते. यावेळी मंडळांनी ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे तंत्रज्ञान विद्यापीठाने केलेल्या सर्वे नुसार पुण्याच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाला पुन्हा एकदा धाब्यावर बसवले गेल्याचं समोर आलं आहे. या वर्षीच्या मिरवणुकीतील आवाज सर्वाधिक (सरासरी 128.8 डेसिबेल्स) नोंदवला गेला आहे. यावेळी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लघन होवून लक्ष्मी रस्त्यावर सरासरी पेक्षा दुपटीने आवाज नोंदवला गेला. तर या दोन दिवसांत येथील वातावरण अतिशय असह्य होते असं मत स्थानिकांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: पुण्यात विसर्जनाला गालबोट: गणपती मंडळात आणि पोलिसांमध्ये झटापट

डीजेच्या आवाजामुळे अनेक लोकांनी त्रास झाल्याचं सांगितलं. गेल्या दोन दिवसांत आवाजाची सर्वात कमी पातळी शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारात खंडूजी बाबा चौकात 64.0 डेसिबेल्स एवढी नोंदवली गेली होती. आणि सर्वात जास्त आवाजाची पातळी शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास खंडूजी बाबा चौकात 128.5 डेसिबेल्स नोंदवली गेली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची घोषणा केल्यामुळे मंडळांकडून अनेक नियम मोडण्यात आले. यावेळी पोलिसांनाही कारवाई करण्यासाठी अडचणी येत होत्या. तर दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरवणुकीला उशीर झाला असून तब्बल 30 तास मिरवणूक चालली.

Web Title: Pune Public Ganesha Visarjan Procession Resurrects Noise Pollution

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..