लाचखोरीत पुणे अव्वल... तर औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर

गुन्हेगारी शहर म्हणून ओळखली जाणारी मुंबई लाचखोरीत आठव्या क्रमांकावर
Pune tops in bribery
Pune tops in briberyटिम ई सकाळ
Updated on

सांस्कृतिक शहर आणि शिक्षणाचे माहेरघर असलेलं पुणे सर्व गोष्टीत परिपूर्ण आहे. इथे कुठल्याच गोष्टीची उणीव भासत नाही. आणि असंच काहीसं घडलंय राज्यभरात लाचखोरीत अव्वल क्रमांक मिळवल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (Anti Corruption Bureau) कडून समोर आले आहे. विशेष म्हणजे लाच घेणे आणि लाच देणे, या दोनही गोष्टीत पुणे पहिल्या क्रमांकावर आहे.

Pune tops in bribery
देशात 3 लाख 37 हजार नवे कोरोना रुग्ण; 488 रुग्णांचा मृत्यू

पुण्यात मागील वर्षभरात एकूण १६८ लाचखोरीचे प्रकरणे उघडकीस आले. यामध्ये जवळपास २४२ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर मागील वर्षी पुण्यात पोलीस विभागातील सर्वाधिक अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना सापडले. पुणे लाचखोरीत अव्वल येण्याचे कारण म्हणजे इथे लाचखोरीविरोधात आवाज उठवला जातो. इतर शहराच्या तुलनेत पुणे इथे जागरूक नागरीकांची संख्या जास्त असल्याने इथे लाचखोरीविरोधात तक्रार करण्याचे प्रमाण अधिक आहे.

Pune tops in bribery
ग्लोबल पुरस्कार प्राप्त डिसले गुरुजींवर शिक्षण विभागाकडून कारवाई

लाचखोरीत पुणे अव्वल क्रमांकावर तर औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. उल्लेखनीय म्हणजे यात महाराष्ट्राची राजधानी आणि क्राईम कॅपिटल समजली जाणारी मुंबई आठव्या क्रमांकावर आहे. कुठल्याही कामासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच देऊ नका कुणीही लाच मागितल्यास त्यांची एसीबीकडे लेखी तक्रार करा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांना नागरीकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com