
कोल्हापूर : भष्ट्राचारमुक्त सर्व व्यवहार व्हावेत हे शासनाप्रमाणे सर्वांनाच अपेक्षित होते. तरीही काही घटकांची प्रवृत्ती ही चिरिमिरी घेतल्याशिवाय कामच करायची नाही अशी असते. अशा प्रवृत्तीवर कारवाई करण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केले जाते. प्रत्येक कार्यालयाबाहेर लाच घेणे व देणे हा गुन्हा आहे.
लाचेची मागणी होत असेल तर तक्रारीबाबतचे फलक लावलेले आहेत. विभागाकडून याबाबत वारंवार प्रबोधनाचीही मोहीम राबविली जाते. याचेच फलित म्हणजे तक्रारदारांचे प्रमाण वाढू लागले आहे. आलेल्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेत लाचखोरांवर कारवाईचा सपाटा विभागाने लावला आहे.
१३ महिन्यांत २५ कारवाया
मात्र आता चिरिमिरी घेतल्याशिवाय काम न करणाऱ्या प्रवृतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दणका दिला. १३ महिन्यांत केलेल्या २५ कारवाईत छोट्यांबरोबर मोठे मासेही जाळ्यात पकडले. शासकीय अथवा निमशासकीय कार्यालय असो तेथे सर्वसामान्यांची कामे सहज आणि लवकर व्हावीत.
२०२० मधील विभागातील कारवाई अशा
संपूर्ण परिक्षेत्रात दाखल गुन्हे - ५४८
पुणे विभागातील गुन्ह्यांची नोंद - १२३
परिक्षेत्रातील संशयित - ५७९
पुणे विभागातील संशयित - १२६
कोल्हापूर विभागाची कारवाई - २२
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.