
मुंबई : काद्यांचे भाव पडल्यानं राज्यातील शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक ताण आला आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं केंद्राला नाफेडमार्फत २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची विनंती केली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियूष गोयल यांना मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत पत्र लिहिलं आहे. (Purchase another 2 lakh tonne onion to support farmers Maharashtra requests Centre)
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कांद्याचे भाव पडल्यानं मोठ्या अर्थिक संकटात आहेत. त्यामुळं केंद्र सरकारनं आपल्या नॅशनल अॅग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) मार्फत २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
२० लाख मेट्रिक टन अधिक उत्पादन
याबाबत मुख्यमंत्री कार्यालयानं माहिती दिली आहे, पण राज्यातील सध्याचा कांद्याचा भाव काय आहे याचा उल्लेख केलेला नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्वाचं नगदी पीक आहे. भारतात कांद्याचं ३५ ते ४० टक्के उत्पादन होतं. चांगल्या पावसामुळं १३६.७० लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज २०२१-२२ मध्ये वर्तवण्यात आला होता, जो गेल्या हंगामापेक्षा २० लाख मेट्रिक टन अधिक आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यानं एकूणचं कांद्याचा बाजारभाव दणक्यात कोसळला आहे. त्यामुळं कांदा उत्पादकांमध्ये निराशेचं आणि चिंतेच वातावरण आहे, असं सीएमओनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
श्रीलंकेतील निर्यात थांबल्यानं अडचण
दरम्यान, श्रीलंकेकडून भारतातून सर्वाधिक प्रमाणात कांदा आयात केला जातो. पण श्रीलंकेतील निर्यात ठप्प झाली आहे कारण त्या देशात सध्या आर्थिक संकट निर्माण झालं आहे. एकूणचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलत्या घडामोडीमुळं निर्यातीमार्फत आपल्या शेतकऱ्यांना मालाची चांगली किंमत मिळणं अशक्य आहे, असंही मुख्यमंत्री कार्यालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.