esakal | 'लोकांसाठी तो चाणक्य, मात्र आमच्यासाठी तो फक्त आमचा बाबा!'
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut-Purvashi-Raut

राऊत हे कुटुंबासोबत असताना कसे राहतात, त्यांचे वेगवेगळे पैलू पूर्वशीने थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

'लोकांसाठी तो चाणक्य, मात्र आमच्यासाठी तो फक्त आमचा बाबा!'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकाच व्यक्तीचं नाव वारंवार कानावर पडत आहे, ते म्हणजे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत. आज त्यांचा 58 वा वाढदिवस असल्याने त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

वाढदिवसाचे निमित्त साधत राऊत यांच्या मुलीने पूर्वशीने आपल्या लाडक्या पप्पांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. पूर्वशीने फेसबुक या सोशल साईटवर एक पोस्ट लिहली आहे. तिने लिहलं आहे की, ''लोकांसाठी जरी तो चाणक्य किंवा बिरबल असला तरी आमच्यासाठी मात्र तो फक्त आमचा बाबा आहे...!''

'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन' असे म्हणणार नाही, पण... : संजय राऊत

संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. एकटाकी अग्रलेख लिहणारा संपादक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांचा हाच गुण त्यांच्या मुलीने लिहलेली ही पोस्ट वाचताना दिसून येतो. राऊत हे कुटुंबासोबत असताना कसे राहतात, त्यांचे वेगवेगळे पैलू पूर्वशीने थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

- ओबामा यांचा हॉटेलमधील 'तो' व्हिडिओ व्हायरल; पण...

संजय राऊत यांना पूर्वशी आणि विदीता या दोन मुली आहेत. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत या शिक्षिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत कामात व्यस्त असलेल्या राऊत यांच्यावर कामाचा ताण आल्यामुळे दवाखान्यात अॅडमिट करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अॅजिओप्लास्टी करण्यात आली. त्यामुळे राऊत यांचे हितचिंतक आणि शिवसैनिकांनी त्यांना दीर्घायुष्य लाभावे, या शुभेच्छाही त्यांना दिल्या.

- करीना, कियारा डिसेंबरमध्ये देणार 'गुड न्यूज'