राज्यसभेच्या उमेदवारीवरून आशिष देशमुखांनी काँग्रेसलाच विचारले प्रश्न

Questions asked by Ashish Deshmukh to Congress from Rajya Sabha candidature
Questions asked by Ashish Deshmukh to Congress from Rajya Sabha candidatureQuestions asked by Ashish Deshmukh to Congress from Rajya Sabha candidature

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करताना महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे बाहेरचा उमेदवार देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. यावेळी उत्तर प्रदेशातील मुस्लिम नेते इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेचे उमेदवार बनविले आहे. प्रतापगढी यांना उत्तर प्रदेश सोडून महाराष्ट्रातून उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार आणि आमच्या सारखे कार्यकर्ते नाराज झाल्याचे काँग्रेसचे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) म्हणाले. (Questions asked by Ashish Deshmukh to Congress from Rajya Sabha candidature)

उमेदवारी जाहीर करताना काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून, तर नागपूरचे मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांना राजस्थानातून संधी दिली आहे. वास्तविक मुकुल वासनिक यांना नागपुरातून उमेदवारी द्यायला हवी होती. कारण, त्यांचा संपर्क नागपूर व विदर्भातील नेत्यांशी व जनतेशी कायम राहील. मात्र, महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, असेही आशिष देशमुख (Ashish Deshmukh) म्हणाले.

Questions asked by Ashish Deshmukh to Congress from Rajya Sabha candidature
मुकुल वासनिकांच्या उमेदवारीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

बदल होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र, याच प्रकारचे निर्णय होत असतील तर सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच्या निर्णयाबाबत जो प्रश्न पडतो तोच प्रश्न काँग्रेसच्या (Congress) नेत्यांना पडू लागला आहे. आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करू. मात्र, वारंवार हे होत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रश्न पडतोय की त्यांनी बघावं तरी कोणाकडे, असेही आशिष देशमुख म्हणाले.

कोण आहे इम्रान प्रतापगढी?

इम्रान प्रतापगढी यांचे मूळ नाव इम्रान खान आहे. मात्र, ते प्रतापगढी लावतात. ते एक कव्वाल आहे. उत्तर प्रदेश सोडून त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली गेली आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढविली होती. मात्र, साडेसहा लाखांपेक्षा अधिक मतांनी ते पराभूत झाले होते. त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. तरीही त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

Questions asked by Ashish Deshmukh to Congress from Rajya Sabha candidature
पाचवीच्या विद्यार्थ्याने दिली सामूहिक गोळीबाराची धमकी; पोलिसांनी केली अटक

‘एक कुटुंब एक पद’चे काय?

‘एक कुटुंब एक पद’ असे काँग्रेसने (Congress) ठरविले होते. मात्र, पी. चिदंबरम यांचा मुलगा लोकसभेत असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी का दिली? दुसरीकडे महाराष्ट्रातून राज्यसभेची मुदत संपलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तामिळनाडूतून उमेदवारी दिली आहे. प्रमोद तिवारी यांच्या मुलगी आमदार असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. ५० वर्षांवरील नेत्यांना तिकीट देणार नाही असा निर्णय झाला असताना १५ दिवसांत या निर्णयाला तिलांजली दिली, असेही आशिष देशमुख (Ashish Deshmukh) म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com