भाजप प्रवेशाची तारीख अद्याप ठरलेली नाही : विखे पाटील

Radha Krishna Vikhe Patil
Radha Krishna Vikhe Patil

मुंबई : काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (मंगळवार) दिली. याबाबतचा अंतीम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विखे पाटील व त्यांचे पूत्र आणि नगरचे नवनिर्वाचित खासदार डाॅ. सुजय यांनी गिरीश महाजन यांची आज भेट घेतली. त्यानंतर महाजन यांनी वरील माहिती दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा महाजन यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना विखे म्हणाले, "भाजप प्रवेशाची अद्याप तारीख ठरलेली नाही. मात्र, योग्य वेळी त्याबाबत निर्णय होईल.मला काँग्रेसमध्ये त्रास झाला. सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही हे खरे आहे. अद्याप माझ्यासोबत कोण प्रवेश करणार हे निश्चित झालेले नाही. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सध्या काही बोलणे झालेले नाही," 

डाॅ. सुजय विखे म्हणाले, "वडिलांना काँग्रेसमध्ये सन्मान दिला जात नव्हता हे मी पाहिले आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा असे त्यांना सांगितले देखील आहे. मात्र, त्यांच्यासोबत किती जण प्रवेश करणार हे निश्चित नाही,"  उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याचेही डाॅ. सुजय यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com