`जीएसटी'आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा: विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीसाठी आजपासून राज्याचे तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला मुंबईत सुरवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर विखे-पाटील बोलत होते. जीसएटी विधेयक केंद्रात मंजूर झाले असून आता राज्यात जीएसटी मंजूर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. 

मुंबई - `जीएसटी विधेयका इतकंच शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्‍यक आहे. सरकारने आधी कर्जमाफीची घोषणा करा. आता अभ्यासाला वेळ नाही; आता घोषणा करा. बहुमताच्या जोरावर मुस्कटदाबी होत आहे. कर्जमाफी होईपर्यंत संघर्ष यात्रा सुरु राहणार,'' असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (शनिवार) सांगितले. 

वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीसाठी आजपासून राज्याचे तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला मुंबईत सुरवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर विखे-पाटील बोलत होते. जीसएटी विधेयक केंद्रात मंजूर झाले असून आता राज्यात जीएसटी मंजूर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. 

एकीकडे कर्जमाफीसाठी विरोधकांनी राज्यभर संघर्षयात्रा काढली आहे. विरोधकांसह शिवसेनाही कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा गाजण्याची शक्‍यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधकांच्या बहिष्काराने गाजले . हे जीएसटी अधिवेशन विरोधकांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा गाजण्याची शक्‍यता आहे. फडणवीस सरकारसमोर विधेयक मंजूर करण्याचे आव्हान आहे. 

दरम्यान, शिक्षण, आरोग्य आणि अन्नधान्यावर जीएसटी लागणार नाही. पण सिनेमा पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. श्रीनगरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जीएसटी परिषदेत विविध सेवांसाठी करनिश्‍चिती केली असून त्याची 1 जुलैपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

जीएसटी परिषदेने गुरुवारपर्यंत 1 हजार 211 वस्तू आणि सेवांची करनिश्‍चिती केली आहे. मात्र सोन्याच्या कराबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून, पुढची बैठक 3 जूनला होणार आहे. 

Web Title: Radha Krishna Vikhe Patil criticize on government