राफेलमुळे भाजप जाणार - पाटील

MB-Patil
MB-Patil

सोलापूर - ‘लोकसभेच्या तब्बल ४४० जागा जिंकलेल्या काँग्रेसला बोफोर्स प्रकरणामुळे पराभवाला सामोरे जावे लागले, त्याच पद्धतीने राफेल विमान खरेदी प्रकरणात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागेल,’’ असा दावा कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार एम. बी. पाटील यांनी केला.

काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी पाटील शुक्रवारी सोलापुरात आले होते, त्या वेळी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. त्यांच्यासमवेत आमदार सावनूर व माजी आमदार एम. बी. कटकधोंड आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला तब्बल ४४० जागा मिळाल्या. मात्र, बोफोर्स प्रकरणात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव आले आणि पुढच्याच निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे ३०० जागा मिळवून आम्ही म्हणेल तो कायदा, अशी भूमिका घेणाऱ्या भाजप सरकारला काँग्रेससारखा अनुभव यायला वेळ लागणार नाही. वर्षभरातील चित्र बदलायला सुरवात होईल. हे कालचक्र सतत सुरूच राहणार आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com