‘राफेल’चा पैसा निवडणुकांसाठी - संजय राऊत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

धुळे - राफेल विमान खरेदीत दोन ते तीन लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून त्यातील पैसा ठिकठिकाणच्या निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून होत असेल तर तो देशद्रोहच आहे, असा जहाल आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज येथे केला. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे इव्हीएम मशिन हॅकर, यातील मास्टर माईंड असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. 

डिसेंबरमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात आज शिवसेनेच्या महानगर शाखेचा मेळावा झाला. खासदार राऊत प्रमुख मार्गदर्शक होते. तत्पूर्वी, पत्रकार परिषद झाली. 

महाजन यांच्यावर टीका
राऊत म्हणाले, की इव्हीएम मशिन हॅक करून जळगाव, सांगली पालिका निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या मंत्री महाजन यांना धुळे महापालिकेच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत असे काही करता येणार नाही. भाजपने पालघरची निवडणूक इव्हीएममध्ये फेरफार करून जिंकली. 

लुटीतील पैसा निवडणुकीत
मोदी आणि फडणवीस या जोड गोळीने राज्यासह देश खड्ड्यात घातला. निवडणुकीत पॅकेज द्यायचे, त्या बळावर इच्छुकांची संख्या वाढवायची, पैशाचा पाऊस पाडायचा आणि निवडणूक जिंकायची, असा भाजपचा फंडा आहे. सैनिकांच्या रक्ताचा, राष्ट्रभक्तीचा व्यापार करून लढाऊ तीनशे राफेल विमान खरेदीत दोन ते तीन लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून त्यातील पैसा ठिकठिकाणच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून होत असेल तर तो देशद्रोहच आहे. 

राऊतांचे विधान बालीशपणाचे
जळगाव - संजय राऊत यांचे विधान अत्यंत बालीशपणाचे आहे. त्यांच्यासारख्या नेत्यांनी असे बोलणे योग्य नाही. त्यांनी निवडणूक आयोगाकडे ‘बॅलेट’द्वारे मतदानाची मागणी करून निवडून येऊन दाखवावे, असा टोला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री
२०१९ मधील निवडणुका चमत्कार आणि परिवर्तन घडविणाऱ्या असतील. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. देशाचा गृहमंत्री शिवसेनेचा असेल. पंतप्रधान ठरविण्याच्या प्रक्रियेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल. यावेळी निवडणुकांत कोणतीही लाट असणार नाही असा दावा त्यांनी केला. 

Web Title: Rafale funds for elections - Sanjay Raut