Rahul Bondre BJP Entry Cancelled : राहुल गांधींचा एक कॉल प्रोब्लेम सॉल्व! राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; गांधींनी कॉलवर काय सांगितलं?

Rahul Gandhi : राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश अखेर रद्द झाला. राहुल गांधींनी फोन करून बोंद्रेंशी संवाद साधला. या फोनवर राहुल गांधी काय म्हणाले?
Rahul Bondre BJP Entry Cancelled

Rahul Bondre BJP Entry Cancelled

esakal

Updated on

Buldhana Politics Maharashtra : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय अखेरच्या क्षणी मागे घेतला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी थेट फोनवरून संवाद साधल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच हा राजकीय उलटफेर झाल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com