राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्यामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. अशातच आता राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरे गटाला राहुल गांधींच्या थोबाडीत मारण्याचं आवाहनही केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेत सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाला आव्हानही दिलं आहे. ठाकरे गटाने राहुल गांधी यांच्या सावरकरांबद्दल विधानावरून टीका केली होती.
ठाकरे गटाला आव्हान देताना शिंदे म्हणाले, "सावरकरांचा अवमान करणाऱ्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक क्षेत्रांमध्ये योगदान दिलंय. त्यामुळे संपूर्ण देश त्यांचा ऋणी आहे. विधानसभेच्या अधिवेशनात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे एकही शब्द बोलत नव्हते. उलट राहुल गांधींसाठी काळ्या फिती लावून काँग्रेसबरोबर दिसले.
शिंदे पुढे म्हणाले,"सावरकरांना अपमान सहन करणार नाही, असं म्हणणारे अधिवेशनात मूग गिळून गप्प होते. कालच्या जाहीर सभेत मात्र बोलले. बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत दिली होती. तुम्ही राहुल गांधी यांच्या थोबाडीत देणार का? तुम्ही बोलून काय होणार, कृतीतून दिसलं पाहिजे."
या पत्रकार परिषदेनंतर अगदी जाता जाता मुख्यमंत्री शिंदेंनी एक फोटोही माध्यमांना दाखवला. यामध्ये बाळासाहेब ठाकरे मणिशंकर अय्यर यांच्या मास्क लावलेल्या पुतळ्याला चपलेने मारताना दिसत आहे. शिंदेंनी अगदी जाता जाता दाखवलेला फोटो वर दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.