Rahul Shewale
Rahul Shewaleesakal

Rahul Shewale: राहुल शेवाळे यांची 'त्या' महिलेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी हायकोर्टात आज एक याचिका दाखल केली आहे.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी हायकोर्टात आज एक याचिका दाखल केली आहे. सोशल मीडियावर आपली बदनामी केल्याचा आरोप शेवाळे यांनी केला आहे. तसेच या महिलेशी नाव जोडून इतरांनी टाकलेल्या पोस्ट हटवण्याची मागणी देखील शेवाळे यांनी केली आहे.(Rahul Shewale)

मागिल महिन्यात दिशा सालियन प्रकरण पुन्हा उकरून काढल्यामुळं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे शिवसेनेच्या रडारवर आले होते.

भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं केलेल्या लैंगिक अत्याचार व मानसिक छळाच्या तक्रारीची दखल घ्यावी व या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेनं केली होती.

त्यानंतर पत्रकार परिषद घेत शेवाळे यांनी आरोप फेटाळून लावत त्यावर स्पष्टीकरण दिलं होते. दरम्यान, आज त्या महिलेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

Rahul Shewale
Uddhav Thackeray : शिवसेना, धनुष्यबाणाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर...

काय म्हटले आहे शेवाळे यांनी ?

गंभीर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात मुंबई हायकोर्टात शेवाळे यांनी याचिका दाखल केली आहे. त्या महिलेचं सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्यात यावं. तिला आपल्यासंदर्भात कोणतीही पोस्ट टाकण्यापासून मनाई करण्यात यावी.

Rahul Shewale
Sunil Tatkare: खासदार सुनिल तटकरेंकडून शिंदे गटाच्या नेत्याची जिल्ह्यात कोंडी

तिला ट्विटरच नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हद्दपार करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. आणि खटला निकाली लागेपर्यंत तिची सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स तात्काळ बंद करण्यात यावी. असही शेवाळे म्हणाले आहेत.

खालच्या पातळीवरची टीका करुन माझी राजकीय कारकिर्द संपवण्याचा हा कट असल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com