Police Raid solapur nayan Lodge
सोलापूर : सोलापूर शहरातील लक्ष्मीनारायण टॉकीजमागील आदर्श नगरातील नयन लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी तेथे एक पीडिता आढळली. पोलिसांनी तिची सुटका केली असून लॉज मालक भारत पांडुरंग जाधव (वय ५८) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याला न्यायालयाने २० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
लक्ष्मीनारायण टॉकीजजवळील नयन लॉजवर अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता. त्याची खबर पोलिसांना १६ सप्टेंबरला मिळाली होती. त्या माहितीवरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने बनावट ग्राहक पाठवून त्याबद्दल खात्री केली. त्याठिकाणी एक पीडिता होती. तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन लॉज मालक भारत पांडुरंग जाधव हा त्याची उपजिविका भागवत होता. त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक श्री. शिंगाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस उपनिरीक्षक हेमंत मंठाळकर, पोलिस हवालदार महादेव बंडगर, सत्तार पटेल, अलमा शहापुरे, अकिला नदाफ, सुशीला नागरगोजे, सविता म्हेत्रे, अरुणा परब, वैशाली बांबळे, सुजाता जाधव, उषा मळगे, सीमा खोगरे आदी पार पाडली.
ग्राहकांना दाखवायचा मोबाईलमधील फोटो अन्...
नयन लॉजचा मालक भारत जाधव हा अनेक महिन्यांपासून अवैधरीत्या कुंटणखाना चालवत होता. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तेथे एकच पीडिता सापडली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, लॉज मालकाने त्याच्याकडे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले होते. ग्राहक आल्यावर त्यांना तो फोटो दाखवत होता आणि ग्राहकांना जी महिला पाहिजे तिला बोलावून वेश्या व्यवसाय करून घेत होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.