बायकोने रोखले अन् जीव वाचला !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

कृषीविद्यापीठाचे कर्मचारी प्रविण रणदिवे हेदेखील या सर्वांसोबत सहलीला जाणार होते. मात्र, त्यांच्या पत्नीने त्यांना न जाण्याची विनंती केली होती. त्यामुळे प्रविण यांनी तब्येत ठिक नसल्याचे कारण देत त्यांच्यासोबत जाणे टाळले. त्यांच्या याच टाळण्यामुळे त्यांचा जीव आज वाचला आहे.

रायगड : महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात बस कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला. कृषीविद्यापीठाचे कर्मचारी प्रविण रणदिवे हेदेखील या सर्वांसोबत सहलीला जाणार होते. मात्र, त्यांच्या पत्नीने त्यांना न जाण्याची विनंती केली होती. त्यामुळे प्रविण यांनी तब्येत ठिक नसल्याचे कारण देत त्यांच्यासोबत जाणे टाळले. त्यांच्या याच टाळण्यामुळे त्यांचा जीव आज वाचला आहे.

याबाबत प्रविण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, की मी आज सकाळी साडेसहाला माझ्या सहकाऱ्यांना तब्येत बरी नसल्याचे सांगत सहलीला येणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर माझे आणि आमच्या सहकाऱ्यांशी सकाळी नऊ वाजेपर्यंत संभाषण सुरु होते. मात्र, त्यानंतर कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर बातमी आली ती या अपघाताची. ही बातमी दुपारी साडेबारा वाजता टीव्हीवरूनच समजली. ही बातमी ऐकल्यानंतर अत्यंत दु:ख झाले. 

Web Title: Raigad Accident One save their live because of his wife