

Raigad Traffic Advisory
ESakal
अलिबाग : रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्तांची गर्दी उसळणार असल्याने प्रशासनाने वाहतुकीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. शिवभक्तांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा तसेच संभाव्य कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी ४ वाजल्यापासून शनिवारी (ता. ६) रात्री १० वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.